dr.satish best web design developer for mac

नौकुड ग्रामपंचायत :

सामानगडाच्या पायथ्याशी वसलेलं, छोटस पण आखीव व टुमदार असे आमचं नौकुड गाव. सुख-समाधानाने बहरलेलं, माणसाची माणुसकी जपणारं, गडहिंग्लज तालुक्यापासून 14.8 किलोमीटर अंतरावर असलेल सुंदर व सुसज्ज असे आमचं गाव. गावाच्या शेजारी नरेवाडी, सामानगड, हलकर्णी ही गावे आहेत. ग्रामपंचायती तर्फे राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत गावामध्ये विहिरी खणल्या आहेत. हे पाणी नळ कनेक्शन व्दारे गावामध्ये पुरविण्यात आले आहे. गावामध्ये घरोघरी शौचालय बांधण्यात आले आहे. त्यामुळे आमचा गाव हागणदारीमुक्त गाव आहे. गावात ग्रामपंचायत द्वारे स्वच्छता राखण्यासाठी कचरा कुंडी बसविलेल्या आहेत. गावातील लोकानी निर्मल ग्रामसाठी चांगले सहकार्य केले आहे. गावातील जेष्ठ नागरीक, पदाधीकारी, पंचायत समीतीचे अधिकारी तसेच ग्रामसेवक यानी निर्मलग्रामसाठी पुढाकार घेतला आहे. गावामध्ये अंतर्गत रस्ते पक्के आहेत, तसेच अंतर्गत गटारींची बांधकाम चंगल्या पध्द्तीने केलेली आहेत. गाव तंटामुक्त आहे गावात रात्रीचा वेळी प्रकाशासाठी स्ट्रेट लाईट बसविण्यात आले आहेत.


ग्रामपंचायत कार्यप्रणाली :

आमच्या गावात ग्रामपंचायतीची स्थापना 1962 साली झाली. ग्रामपंचायतीची निवडणूक ही दर पाच वर्षानी होते. ग्रामपंचायतीचा कारभार पाहण्यासाठी गावाचा प्रथम नागरिक म्हणून सरपंच व इतर सात सदस्यांची गावातील नागरिकांच्या एकमताने नेमणूक केली आहे. यांच्यामार्फत गावाचा कारभार, विकास, गावातील लोकांच्या समस्यांची सोडवणूक, गावात शासनाच्या येणाऱ्या योजना राबविणे आदी ग्रामविकासाची कार्ये केली जातात.

सरपंच
सौ. वंदना आप्पासो चव्हाण

गावाला रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण इ. पायाभूत सुविधा देऊन गावाचा विकास करण्यासाठी मी प्रयत्न करते.

उपसरपंच
श्री. भिमराव आप्पा गोडसे

गावातील लोकांमध्ये बंधू भाव निर्माण करुन आपल्या गावाचा विकास करण्यासाठी माझा प्रयत्न असतो.

ग्रामसेवक
सौ. विद्या शिवाजी नावलगी

गावामध्ये सुव्यवस्था राखणे, विविध सरकारी योजनांबद्दल माहिती देण्याचा माझा प्रयत्न असतो.

FOLLOW US

Gadhinglaj City- Kolhapur Maharashtra

ADDRESS
Naukud Grampanchayat
A/P- Naukud,Tal- Gadhinglaj Dist- Kolhapur
416506

CONTACTS
Phone :

Office :